Surprise Me!

सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर मिरवणुकीत पाडला नोटांचा पाऊस | Pune|Sarpanch | Garmpanchayat|Sakal Media |

2021-04-28 77 Dailymotion

दावडी : सरपंचपदाची निवडणुक म्हणलं की नेते व कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येते. विजयी उमेदवार आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटतात किंवा विजयी उमेदवारांची गावात-वाजत गाजत मिरवणुक काढली जाते. मात्र याही पुढे जाऊन दावडी (ता. खेड) येथील विजयी उमेदवार व समर्थकांनी सरपंच व उपसरपंच यांना निवडणुकीनंतर हार घालण्यासाठी क्रेनचा वापर केला तर फोटोसेशन जेसीबीवर केले. कहर म्हणजे एका कार्यकर्त्याने चक्क नोटांची उधळण करत आनंद व्यक्त केला.<br /><br />दावडी येथे बुधवार (ता. २४ रोजी) सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणुक झाली. या निवडणुकीमध्ये सरपंचपदी संभाजी घारे व उपसरपंचपदी राहूल कदम बिनविरोध निवडले गेले. निवडणुक झाल्यावर उत्साही कार्यकर्त्यांनी मोठा हार आणून क्रेनच्या सहाय्याने तो हार सरपंच व उपसरपंचांना घालण्यात आला. एका कार्यकर्त्याने नोटांचे बंडल काढून पैशांची उधळण केली.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon